इतिहास आणि वारसा
श्री सोमेश्वर देवस्थान मंदिराचा गौरवशाली इतिहास
श्रद्धा, परंपरा आणि स्थापत्याचा समृद्ध वारसा
मंदिराच्या ऐतिहासिक प्रवासापासून प्राचीन वास्तुकला आणि आजपर्यंत जपलेल्या परंपरांचा मागोवा घ्या.
उत्पत्ती आणि आख्यायिका
स्वयंभू शिवलिंगाची कथा
एका गायीची, एका गुराख्याची आणि अनंत श्रद्धेची गोष्ट…
असे मानले जाते की, पूर्वी या परिसरात एक गुराखी आपली गाय चारण्यासाठी आणत असे. एके दिवशी त्या गायीने नेहमीप्रमाणे मंदिराच्या जागी वारंवार येऊन आपले दूध एका विशिष्ट जागी सोडले. गुराख्याने हे पाहिले आणि त्या ठिकाणी खणून पाहिले, तेव्हा त्याला स्वयंभू शिवलिंगाचा शोध लागला. त्या दिवसापासून या स्थळाला पवित्रत्व प्राप्त झाले आणि येथे श्री सोमेश्वर देवस्थानांचे मंदिर उभारण्यात आले, अशी श्रद्धा आहे.
-
गायींची कृपा
पवित्र स्थळाची पहिली चिन्हे.
-
स्वयंभू शिवलिंग
निसर्गातून प्रकटलेले दैवी रूप.
-
आजचा वारसा
शतके उलटली, श्रद्धा आजही तितकीच अढळ.
“ही कथा श्रद्धेची आहे, इतिहासाची नव्हे; परंतु या श्रद्धेनेच या मंदिराला आजचे स्थान दिले आहे.”
इतिहासाचा कालप्रवाह
History Through the Ages
मंदिराची अंदाजे ९०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी
श्री सोमेश्वर देवस्थान मंदिराचा जीवनपट व जीर्णोद्धार वर्षे
जीर्णोद्धार व विकासाचा प्रवास
-
राजा आदित्यवर्मन
यांचा काळ(इ.स. ९६५)
राम नदीवरील वसाहतीनुसार प्राथमिक अवस्थेतील मंदिराची निर्मिती.
-
यादव काळ
(इ.स. १२ वे शतक)
मंदिर रचना व स्मृतिशिलेवरून मंदिराची स्थिर स्थापना.
-
जिजाऊ आईसाहेब
(इ.स. १६४० ते १६५०)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ आईसाहेब यांनी जीर्णोद्धार व व्यवस्था केली.
-
महाराणी येसूबाई
(इ.स. १७०८ ते १७४९)
छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंनी जीर्णोद्धार केला.
-
माधवराव पेशवे
(इ.स. १७६१ ते १७७२)
माधवराव पेशव्यांचा येथील वावर, जीर्णोद्धार व सुधारणा.
-
श्री सोमेश्वर सेवा मंडळ
(इ.स. १९६८ ते २००५)
जीर्णोद्धार व सुधारणा
(श्री. पारखे, श्री. महादेव निम्हण व श्री. पोपटराव जाधव) -
श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट
(इ.स. २००७ पासून पुढे)
देवस्थान ट्रस्ट, माजी आमदार श्री. विनायक निम्हण, श्री. पोपटराव जाधव, श्री. राधाकिसन लाहोटी व इतर विश्वस्त व ग्रामस्थ.
“इतिहास हा फक्त भूतकाळ नसतो, तो आपल्या वर्तमानाला दिशा देतो आणि भविष्याला प्रेरणा देतो.”
मंदिराची वास्तुकला आणि शिल्पवैभव
Architecture & Sculptural Heritage
हेमाडपंती स्थापत्यशैली, काळ्या पाषाणातील भव्य बांधकाम आणि अद्वितीय शिल्पकलेचा अनमोल ठेवा…
-

हेमाडपंती स्थापत्यशैली
आणि काळ्या पाषाणातील बांधकाम -

गाभारा आणि स्वयंभू
शिवलिंग -

सभामंडपातील कोरीवकाम
आणि दिशादेवतांची शिल्पे -

दीपमाळ, नंदी आणि
मंदिराचे प्रवेशद्वार